आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा भडका उडाला:इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे जिल्ह्यात आंदोलन; वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना फटका; केंद्र सरकारचा ढोल वाजवून निषेध

वणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या होणाऱ्या इंधन दरवाढीच्या विरोधात शुक्रवारी वणी काँग्रेस कमिटीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या आंदोलनात दुचाकी व गॅस सिलिंडरला फुलांचा हार घालून ढोल वाजवण्यात आला.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ करून सामान्यांचे जीवन कठीण केले. खाद्य तेलासह पेट्रोल डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत आहे. गॅस सिलिंडरची किंमतही आवाक्याबाहेर गेली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याच्या भावना या आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त होताना दिसल्या. त्यामुळे सर्व सामान्यांचे जगन कठीण करणारी ही महागाई नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा यावेळी काँग्रेस कमिटीने ढोल वाजवून निषेध केला.

आंदोलनात काँग्रेसचे प्रमोद निकुरे, प्रमोद वासेकर, महेंद्र लोढा, ओम ठाकूर, राजा पाथ्रडकर, प्रमोद लोणारे, पुरुषोत्तम आवारी, पलाश बोढे, प्रमोद इंगोले, मोरेश्वर पावडे, सुनील वरारकर, तेजराज बोढे, रफिक रंगरेज, शाहिद खान, अशोक नागभीडकर, प्रदीप खेकारे, लक्ष्मण पोणलवार, सुधीर खंडाळकर, मंगल मडावी, नीलिमा काळे, वंदना धगडी, सविता ढेपाले आदी सहभागी होते.

प्रतिनिधी | दारव्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले.

सध्या देशात वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. इंधनाची दरवाढ रोज होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली आहे. या महागाई विरोधात काँग्रेसकडून सर्वत्र महागाई मुक्त भारत आंदोलन राबवण्यात येत आहे. महागाईमुळे इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. याविरोधात शुक्रवारी दारव्हा येथे तालुका काँग्रेस कमिटीकडून महागाई मुक्त भारत आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

हा मोर्चा काँग्रेस भवन येथून तहसीलपर्यंत काढण्यात आला होता. तहसील परिसरात आंदोलनकर्त्यांकडून निषेध व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अल्पसंख्याक सेल, ओबीसी सेल व काँग्रेस पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...