आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी व्यवस्थापन संचालक मंडळाची निवड प्रक्रियेसाठी दि. २ एप्रिलला मतदान व मत मोजणी एकाच दिवशी पार पडली. ज्यात काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्व १३ उमेदवार निवडून आले. ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने या सोसायट्या शेतकऱ्यांचा मुख्य आधार असतो. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. पीक अर्जाबरोबरच खते, बियाणे, शेतीची अवजारे यासाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात.
शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात विविध कार्यकारी सोसायटीचे मोलाचे योगदान राहिला आहे. फुलसावंगी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था र.न.९०९ च्या निवडणुकांची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी व्यवस्थापक समिती निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ज्यामध्ये स्वप्नील नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडी पॅनल व विजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने सर्व म्हणजे १३ जागांवर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. दि. २ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया व मत मोजणी असे एकाच दिवशी पार पडली. ज्यामध्ये स्वप्नील नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. फुलसावंगी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर काँग्रेसचा झेंडा रोवला गेला आहे.
२८ वर्षीय तरुण संचालक जगाचा पोशिंद्या जगला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे हे विचार करून तरुण वर्ग सुद्धा आता शेतकरी हितासाठी सरसावत आहे. येथील फारुख खान शफी खान उर्फ बंटी पठाण वय २८ वर्ष यांनी ही सोसायटीची निवडणूक केवळ लडलीच नाही तर सर्वाधिक मतांनी ते विजयी पण झाले. एवढ्या कमी वयात संचालक निवडण्याची बहुधा फुलसावगीमधील ही पहिलीच वेळ असावी. तरुण मंडळींनी शेतकरी विकासाकडे वळणे हे उज्वल भविष्याची नांदीच आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.