आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:घाटंजीत महागाईविरोधात काँग्रेसचा निषेध मोर्चा; मोदी सरकारचा निषेध

घाटंजी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या प्रचंड भाववाढीमुळे जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात मंगळवारी घाटंजी येथे पोलिस स्टेशन चौकातून मोर्चा काढण्यात आला. या वेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन देऊन तहसील कार्यालय घाटंजी येथे मोर्चाची सांगता झाली.

या वेळी काँग्रेसचे किशोरभाई दावडा, जगदीशभाई पंजाबी, डॉ. विजय कडू, माणिकराव मेश्राम, परेश कारिया, सुभाष गोडे, सहदेव राठोड, फारुखबाबू, सहदेव राठोड, राम बाजपेयी, रूपेश कल्यमवार, संजय गोडे, अनंतराव चौधरी, शोभा ठाकरे, प्रजय कडू, मोहन भोयर, बबलू राठोड, गणेश उन्नरकर, सुनील हूड, जितेंद्र जुनगरे, नरेंद्र धनरे, सागर डंभारे, स्वानंद चव्हाण चंद्रकांत सोनटक्के, अक्षय पवार, राहुल दावडा, अरविंद चव्हाण, राजू कडू, लियाकत तंवर, विजय उमरे, वामनराव अवधूतकार, एजाजभाई, आरिफ काजी, डॉ. अतुल चौधरी, गुणवंत लेनगुरे, धनराज कडू, मधुकर घोडाम, बदूराम आडे, विमलताई पुरके, अश्विनी राऊत, ज्योती नागरीकर, रेखा उईके, सुरेखा धात्रक, चंद्रकला चपरीवार, ताई भवरे, संतोषी किणेकर सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...