आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस:नगर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नजीकच्या काळात होऊ घातलेल्या नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणेच लढवत असते. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी स्वतंत्रपणेच लढण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ. नदीम यांनी जाहीर केला.

डॉ. नदीम डी. एन. कॉम्प्लेक्सच्या हिरवळीवर आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पक्षाचे पुसद न. प. निवडणुकीसाठीचे निरीक्षक माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि नगरपंचायत महागावचे माजी उपाध्यक्ष शैलेश कोपरकर हे उपस्थित होते.

दोन्ही निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय केला असून कार्यकर्त्यांच्या भावना ते श्रेष्ठींना ही कळवणार आहे. या बैठकीला पक्ष निरीक्षक प्रकाश पाटील देवसरकर, शैलेश कोपरकर, प्रदेश सचिव डॉ. मोहम्मद नदीम, तालुका अध्यक्ष अजय पुरोहीत, शहर अध्यक्ष ज़िया शेख, जिल्हा महासचिव सय्यद इस्तियाक, अशोक ऊंटवाल, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, गजानन देशमुख,तालुका महिला अध्यक्ष प्रा. संध्या कदम, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अमजद खान, शहर अध्यक्ष नन्हे खान, विठ्ठलराव दुपारते, जब्बार लाखे, सय्यद जानी, विधानसभा अध्यक्ष अभिलाष खैरमोडे, युवक अध्यक्ष जगदीश कदम प्रमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...