आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा धोक्यात:देशाचे संविधान, तिरंगा धोक्यात: प्रदेशाध्यक्ष पटोले

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे संविधान, तिरंगा धोक्यात आले आहे. ते वाचविण्यासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला प्रारंभ केल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. शनिवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेनिमित्त यवतमाळ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, रविवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे यात्रा काढण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी बोलताना दिली.

राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आता तेलंगणा राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आता दोन दिवसानंतर महाराष्ट्रात यात्रा येणार आहे. देश संकटात असताना महाराष्ट्र नेहमीच रक्षणासाठी धावून गेला आहे. आताही तशीच स्थिती आहे. शेगाव येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. राहूल गांधी यांच्या समर्थनात मोठा जनसमुदाय सभेला येणार आहे. राज्यातील सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहे. विरोधकांचा धसका घेत यात्रांना परवानगी नाकारण्याचे काम करीत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

राज्याचे प्रमुख हे जनतेचे हस्तक असतात. मात्र, आपल्या मुख्यमंत्र्यांनी ते प्रधानमंत्री तसेच गृहमंत्र्यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. त्याच पद्धतीने ते काम करीत आहे. राज्यातील तरुण बेरोजगार होत असताना प्रकल्प गुजरातला पाठवल्या जात आहे. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. प्रकल्प शहरातून गेल्याने नागपूरात तरुणांनी आंदोलक केले. त्यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना ‘शेबडे’ म्हणून हिणविले. राज्यातील मुळ प्रश्‍न जनतेसमोर येऊ नये म्हणून सत्ताधारी आमदार भांडतात हे त्यांचे डावपेच आहे. जनतेच्या मनात भाजपविरोधात मोठा रोष आहे. राज्यातूनही मोठा पाठिंबा यात्रेला मिळणार असल्याचे पटोले म्हणाले.

आमदार सांभाळू शकले नाही
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे नुकतेच म्हटले आहे. याबाबत पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना सत्तेत असताना स्वत:चे आमदार सांभाळता आले नाही. त्यांनी आधी आपले घर सांभाळावे आणि नंतर बोलावे, असा उपरोधिक टोला लगावला. राज्यातील एकही नेता, आमदार भाजपसोबत जाणार नसल्याचे शेवटी बोलताना म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...