आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाणी:लिकेज पाईप लाईनमुळे होतोय शहरवासीयांना दूषित पाणी पुरवठा ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अनेक भागात अमृत योजनेचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पाइप लाईन फुटून अनेकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवार, दि. २ जुन रोजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन देण्यात आले. अमृत योजनेच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरातील अनेक भागात पाइप लिकेज तसेच फुटून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. एप्रिल महिन्यात शहरातील वाघापूर परिसरात पाइप लाईन फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामूळे अनेक कुटुंबीय बेघर सुध्दा झाली होती. ही अमृत योजना पिण्याच्या पाण्याची की, वापरायच्या पाण्याची हे देखील कळायला मार्ग नाही. लिकेज पाइप लाइनमुळे शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, उषा दिवटे, मुकेश देशभ्रतार, अजय किन्हीकर, कुंदन महाजन, संगीता उमरे, पल्लवी रामटेके, घनश्याम अत्रे, विशाल पावडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...