आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:ढाणकीत टिपू सुलतान जयंती बॅनरवरून वाद

ढाणकी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्ताने ढणकी शहरात बॅनरबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये व कायदा व्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी तात्काळ ढाणकी शहरात दंगल नियंत्रक पथक तात्काळ बोलावण्यात आले. बिटरगाव ठाणेदार प्रताप भोस यांनी पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवत परिस्थितीवर बारीक नजर ठेवली.

शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त टिपू सुलतान ब्रिगेडकडून जुन्या बसस्थानकावर बॅनरबाजी करण्यात आली होती. यासाठी नगरपंचायतीकडून कुठल्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नव्हती. त्यामुळे अशा विनापरवाना लावलेला बॅनरला त्वरित हटवण्याचे निवेदन नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी बिटरगाव ठाणेदार प्रताप भोस यांना दिले शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठाणेदार प्रताप भोस यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. बिटरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोहन चाटे, बीट जमादार गजानन खरात, निलेश भालेराव, रवी गीते, हाके, मुंडे, कुसराम यांनी चोख बंदोबस्त दिला.

बातम्या आणखी आहेत...