आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाकडून मदतीची अपेक्षा:कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर कुटुंबासाठी ‘ती’ बनली ऑटो चालक; मुलांच्या भवितव्यासाठी हातात घेतली रिक्षा

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यापूर्वी घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबाचा आधारच गेला. वृद्ध सासू-सासरे आणि पाच मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी विधवा महिलेवर आली. आभाळा एवढं दुःख गिळून पती चालवत असलेल्या रिक्षालाच तिने उदरनिर्वाहाचे साधन बनवले. नेर तालुक्यातील परजना गावातील अरुणा अशोक जाधव असे या विधवा महिलेचे नाव असून ती रिक्षा चालवत आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीरित्या हाकत आहे. नेर तालुक्यातील परजना या बंजारा बहुल ४०० लोकसंख्या असलेल्या गावातील अरुणा जाधव असे या विधवा महिलेचे नाव आहे. ती रिक्षा चालवत आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीरित्या हाकत आहे.

अरुणा जाधव यांनी आत्मनिर्भर बनवून रिक्षा चालवण्याचा काम सुरू केले आहे. आपल्या परजना या गावातून अडगाव, शिरजगाव, अजंती, नेर, कारंजा, ललाड अशा ठिकाणी ती रिक्षा चालवत प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडून देतात. तर मजुरांना शेतातून ने-आन करणे, शेतकऱ्यांचे खते शेतात पोहोचवणे, दुकानदारांच्या भाजीपाला आणणे, असे कामे ती रिक्षाच्या माध्यमातून करत आहे. डिझेल खर्च वगळून दोनशे रुपये दिवसाला त्यांच्या पदरात पडतात.

मुलांच्या भवितव्यासाठी हातात घेतली रिक्षा
अरुणा यांना पाच मुले असून मोठी मुलगी अमृता आठवीत, अर्पिता पाचवीत, यश चौथीत, उत्कर्ष सहावी तर लहान आदर्श अंगणवाडीत जाते. आपल्या मुलांचे पुढे काय होणार, घरी शेती नाही. आजपर्यंत मोल मजुरीचे काम येत होते. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावत होता. काहीही करून मुलांना चागले शिक्षण द्यायचे. शिक्षक, पोलिस, अधिकारी बनवायचे तिचे स्वप्न आहे. आपल्यावर जी परिस्थिती आली ती मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी दुःख सारून तिने
रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला.

शासनाकडून मदतीची अपेक्षा
कोरोनामुळे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. आॅटो चालवून घराचा उदरनिर्वाह करत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने द्यायला हवी. किमान मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी शासनाने मदत करायला हवी, एवढीच अपेक्षा अरुणा जाधव यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...