आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:कोरोनामुळे अनाथ 12 बालकांना पीएम केअर योजनेचा मिळाला लाभ; संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोविडमुळे १२ बालकांचे दोन्ही पालक दगावलेले आहे. या बालकांना आपण जिल्हा प्रशासनाची दत्तक बालके असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. कोविड महामारीमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक, कायदेशीर पालक, दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, म्हणून पीएम केअर फॉर चिल्ड्रेन स्कीम या योजनेची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली असून त्यांच्या हस्ते देशभरात कोरोनामुळे अनाथ बालकांना या योजनेचा लाभ देण्याची सुरवात करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे या अनाथ बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते लाभ देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बालकांना तसेच पालकांना योजनेच्या किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन स्कीमचे पासबुक, हेल्थ कार्ड, आयुष्यमान कार्ड, पंतप्रधान यांचे बालकांना पत्र आणि मुलांचे स्नेह पत्र यांचा किटमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात १८ वर्षाखालील ०८ आणि १८ वर्षावरील ४ अशा एकूण १२ बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व बालकांना काय अडचण आहे का, सर्व लाभ मिळाले का, सानुग्रह अनुदान मिळाले काय, अजून काय मदत पाहिजे याबाबत विचारणा केली.

यावेळी मारेगाव, नेर व घाटंजीच्या अनाथ मुलींच्या पालकांनी घराबाबत अडचण व्यक्त केली असता जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत तात्काळ दखल घेवून संबंधितांना त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जात प्रमाणपत्र लवकर मिळण्यासाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. प्राची निलावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, बालगृह अधीक्षक गजानन जुमळे, बाल न्याय मंडळाचे सदस्य अॅड. काजल कावरे, राजू भगत, जिल्हा शल्य चिकित्सकच्या डॉ. रमा बाजोरिया, शिक्षण विभागाच्या शिल्पा पोनपल्लीवार, पोस्ट ऑफिसचे सी. के. लोखंडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अविनाश पिसुर्डे, महेश हळदे, माधुरी पावडे, स्वप्नील शेटे, सुनील बोक्से, वनिता शिरफुले, कोमल नंद पटेल व आकाश बुर्रेवार आणि बालकांचे नातेवाईक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...