आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळ:मुंबईहून यवतमाळकडे येणाऱ्या रुग्णाचा वाटेतच मृत्यू, मृत कोरोना पॉझिटिव्ह समजताच धावपळ

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पॉझिटिव्ह असलेला रुग्ण मुंबई येथून यवतमाळला आणण्याबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई येथून एका रुग्णाला घेऊन आलेली एक रुग्णवाहिका शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. या रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर काही वेळातच हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाली. त्यानंतर मात्र रुग्णालयात धावपळ उडाली. पॉझिटिव्ह असलेला रुग्ण मुंबई येथून यवतमाळला पाठवलाच कसा, याचा शोध सुरू झाला.

मृत व्यक्ती मूळचा जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी होता. तो मुंबई येथे वास्तव्यास होता. त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला काही दिवसांपासून मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्या ठिकाणी उपचारासाठी व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्याला नातेवाइकाने रुग्णवाहिकेतून यवतमाळ येथे आणले, असे नातेवाइकाने सांगितले. मात्र वाटेत त्याची प्रकृती अत्यवस्थ होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी ती रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात आणली.

यवतमाळला आणण्याबाबत प्रश्नचिन्ह : मुंबईहून रुग्ण यवतमाळ येथे रेफर केल्याचे पाहून डॉक्टरही गोंधळले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा मृतदेह पूर्ण जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवला. रुग्णवाहिकेत असलेला त्याचा नातेवाईक आणि दोन चालकांना क्वॉरंटाइन करणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...