आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांनो सावधान:पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना; 24 तासात आढळले पाच नवे पॉझिटिव्ह

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता त्याची झळ यवतमाळ जिल्ह्यात येवुन पोहोचली असल्याचे दिसत आहे. या आठवड्यात दरदिवशी एक कोरोनाचा रुग्ण आढळत असतानाच शनिवार दि. १८ जुन रोजी एकाच दिवशी तब्बल ५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना तोंड वर काढत असल्याचे दिसत असुन नागरिकांना सावधान व्हा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्यात मुंबई, पुणे यासह इतर काही जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने आढळुन येत आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या वतीने पुन्हा कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाचे एकेक रुग्ण आढळुन येण्यास सुरूवात झाली आहे. दिग्रस या तालुक्याच्या ठिकाणी देखील कोरोनाचा रुग्ण आढळुन आला आहे.

शहरातील भोसा परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळुन आल्याने प्रशासन अलर्ट झाले असतानाच शनिवारी एकाच दिवसात पुन्हा नव्याने पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सात तर बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण नऊ झाली आहे. त्यापैकी दोन रुग्ण रुग्णालयात व सात रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोना तपासणीचे एकूण ४२९ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले असुन उर्वरित ४२४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९०७९ आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७७२६७ आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १८०३ जणांचा मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ९.०२ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर आजा १.१७ झाला आहे. मृत्यूदर मात्र २.२८ आहे. कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता राज्य शासनाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी वाढते रुग्ण पाहता पुन्हा कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक झाले आहे.

कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी करा
नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ला सुरक्षीत करावे. असे केल्यास सर्व नागरिक स्वत: सुरक्षीत राहु शकतात आणि आपल्या परिवारालाही सुरक्षीत ठेवु शकता.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...