आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होऊन आता दोन वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत १९ लाख ६२ हजार ९५९ जणांनी पहिला, तर १५ लाख ७१ हजार १२ जणांनी दुसरा डोस घेतला. यात बुस्टर डोस केवळ एक लाख ३४ हजार ५४ जणांनी घेतला. आता केंद्रावर कोविशिल्डचा तुटवडा निर्माण झाला असून, कोव्हॅक्सिन ३५ हजार ६९० लस उपलब्ध आहे.
कोविडच्या वाढलेल्या संसर्गावर प्रतिबंधात्मक लस अत्यंत परिणामकारक ठरली. जिल्ह्यात पहिल्यांदा २०२१मध्ये मकरसंक्रांतीला लसीकरणाला सुरूवात करण्यात आली होती. संसर्गाचा वाढलेल्या वेग लक्षात घेऊन सर्वप्रथम फ्रन्टलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. तद्नंतर टप्प्या-टप्प्याने लसीकरणाला सुरूवात झाली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस अत्यंत प्रभावी होती. त्यामुळे ह्या दोन्ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात होती. जिल्ह्यात एकूण २४ लाख ५० हजार २५७ नागरिकांचे लसीकरण अपेक्षीत होते, परंतू पहिला डोस १९ लाख ६२ हजार ९५९, तर दुसरा डोस १५ लाख ७१ हजार १२ जणांनी घेतला.
मध्यंतरी कोविड-१९ च्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले होते. त्या काळात लस घेणारे सुद्धा बाधित होत असल्याचे निदर्शनास आले होते. केवळ बाधीतांमध्ये लक्षणे कुठल्याही स्वरूपाचे दिसत नव्हते. तरीसुद्धा खबरदारी म्हणून बुस्टर डोस घेण्याबाबतचे आवाहन शासनस्तरावरून करण्यात आले होते. मात्र, बुस्टर डोस घेण्यास नागरिकांचा निरुत्साह मोठ्या प्रमाणात दिसत होता. आजघडीस जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ५४ जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. याची ६.७ एवढीच टक्केवारी आहे.
पहिल्या टप्प्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर नागरिकांची केंद्रावर एकच गर्दी होत होती. अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून लस टोचून घेतली. यात एकाच नंबरवर, तर काही जणांचे चुकीचे नंबर टाकून लस घेतली. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याची चर्चा आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. असे असले तरी बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.