आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्क:एमआयडीसीतील रिकाम्या जागांवर फ्लोरिकल्चर तयार करा

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीत उद्योगासाठी राखीव ठेवलेल्या जागा रिकाम्या पडलेल्या आहेत. या रिकाम्या जागांवर शेतीपुरक व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील भेले यांनी केली आहे. मंगळवारी विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुनील भेले म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसीअंतर्गत नवलाख उब्रे, नानोटी, आकुली, आंबे या क्षेत्रात चार हजार पॉली हाऊस व शेडनेट उभारण्यात आले आहेत. शेतक‍ऱ्यांना मदत करुन फ्लोरिकल्चर पार्क शासनाने तयार केला आहे. यामुळे या क्षेत्रातील शेतकरी समृद्ध झाले आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील कळंब, दारव्हा, घाटंजी, महागाव यासह सर्वच औद्योगिक क्षेत्रावर फ्लोरिकल्चर पार्क तयार करण्याची मागणी बेले यांनी केली. कळंब, दारव्हा, घाटंजी, महागाव येथील एमआयडीसी परिसरात उद्योगाच्या जागा रिक्त आहे.

याठिकाणी शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवकांना शेतीपुरक उद्योग निर्मितीसाठी शासनाने फ्लोरिकल्चर पार्क तयार करुन द्यावा असेही ते म्हणाले. नव्याने समृद्धी मार्ग तयार झाला आहे. नागपूर ते हैद्राबाद मार्गाची घोषणा झाली आहे. नागपूर ते दिल्ली किसान एक्सप्रेस सुरु होणार आहे. त्यामुळ जिल्ह्यात फ्लोरिकल्चर पार्क तयार झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे तळेगाव येथील एमआयडीसी प्रमाणे जिल्ह्यात पार्क तयार करण्याची मागणी बेले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...