आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीव वाचवला:ढोलगाईचा माळावर क्रिकेटपट्टूंनी केले शाळकरी मुलाचे रेस्क्यू

पुसद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर निसर्गाच्या कुशीत फेरफटका मारण्यासाठी शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. अशातच शाळेला सुट्टी असतांना शाळकरी मुले देखील मॉर्निंग इव्हनिंग वॉकसाठी मित्रासोबत ट्रेकिंग करतात. अशातच दि. ७ जूनला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान शाळकरी मुले मित्रासोबत ट्रेकिंग करत असतांना एक शाळकरी मुलगा पाय घसरून पडला. पाय घसरून पडल्याने त्या मुलाचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला. अशावेळी त्याला चालताही येत नव्हते. त्याच वेळी मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंनी त्या मुलाचा आवाज ऐकल्या बरोबर क्रिकेट सोडून त्या शाळकरी मुलाच्या दिशेने धाव घेत त्याच्यावर उपचार सुरू झाला. क्रिकेट खेळाडूच्या तत्परतेने एका शाळकरी मुलाच्या जीव वाचवला असेच म्हणावे लागेल.

सानेश नीरज घोडसाळ असे त्या शाळकरी मुलाचे नाव आहे. संपूर्ण पुसद शहराची मुळे दऱ्या खोऱ्यानी, पर्वत अन् वन राजीनी नटलेले.याच डोंगराईच्या कुशीत उंच उंच डोंगरावर कारला देवस्थान विराजित आहे. त्याच डोंगर माळाचा एक भाग म्हणून पुसद नजिकचा ढोलगाईचा माळ लक्ष वेधून घेतो.याच माळाच्या पायथ्याशी डॉ. एन. पी. हिराणी तंत्र निकेतन आणि बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय देखील आहेत. ढोलगाईच्या माळावरच पुसदच्या निसर्गप्रेमी मित्र मंडळानी वृक्षारोपण व संरक्षणाची जबाबदारी पेलली आहे. दरवर्षी याच ढोलगाईच्या वृक्षारोपणाचा जागर होतो. या निसर्गरम्य स्थळी ट्रॅकिंग म्हणून पहाट फेरीवाल्यांचा राबता असतो. पुरुष, महिला, युवक, युवती, बाल गोपाल ही ट्रॅकिंगचा आनंद लुटतात. हा असाच आनंद लुटताना आपल्या सवांगड्यासह परतीच्या वाटेवर पोदार इंग्लिश स्कूलचा सानेश नीरज घोडसाळ या बारा वर्षीय मुलाचा दि. ७ जूनच्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान पाय घसरून अपघात झाला.

सानेश जोरात किंचाळला. त्याच्या आर्त किंचाळ्या ऐकून याच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मैदानावर क्रिकेट खेळत असलेले एम.ई. क्रिकेट क्लबचे काही खेळाडू खेळ सोडून धावत सुटले. सर्वांनी सानेशला उचलून धीर दिला. पायाला जबर मार लागल्याने त्वरित मालपाणी हॉस्पिटलच्या सुरेश कांबळे यांच्याशी क्रिकेट खेळाडू रवि देशपांडे यांनी संपर्क साधला. त्यानंतर लगेच हॉस्पिटलची रुग्णवाहिका आली. स्ट्रेचरवरून जखमी सानेशला एम. ई. क्रिकेट क्लबच्या विशाल जाधव, सतीश मंदाडे, आकाश डाखोरे, सुनील वाघमारे, सुशील काळे, ऋषी मोरे, नवीन आणि धनंजय त्रंकटवार, अरुण पुलाते, भाऊसाहेब देशमुख, राज देशमुख यांनी ढोल गाईच्या माळावरून खाली तैनात असलेल्या रुग्णवाहिके मधून मालपाणी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यावेळी सानेशचे वडील नीरज घोडसाळ उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...