आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळी प्रलोभने:ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दहा पेक्षा जास्त बँक, पतसंस्थांवर गुन्हे

मयूर वानखडे । यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून काही बँका आणि पतसंस्था यांनी ग्राहकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील जवळपास दहाहून अधिक बँकेने ग्राहकांची फसवणूक करीत कोट्यवधी रूपयांचा गंडा घातल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. त्यामूळे ग्राहकांनो बँकेत खाते उघडताना किंवा व्यवहार करताना काळजी घ्या, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही आपणास भरपूर मदत करु, आपण फक्त सहा महिने रक्कम जमा करा, जेवढी रक्कम जमा होईल, त्याच्या दुप्पट रकमेचे कर्ज आपणास पुरवू, तसेच सहा महिने ठेवी जमा ठेवल्यास दामदुप्पट परतावा देवु अशा एक ना अनेक योजनांचे आमिष सध्या बँकांकडून दाखविले जात आहे.

आपल्याकडील रक्कमेत वाढ होवून ती रक्कम आपल्या कुटुंबीयांच्या कामी येईल, या आशेने सर्व सामान्य नागरिक फसवेगिरी करणाऱ्या बँकांच्या मोहजालात अडकतात. त्याचाच फायदा घेवून अनेक बँकांनी जिल्ह्यातून आपल्या गाशा गुंडाळला. अश्या फसवेगिरीच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहे. घाटंजी शहरातील सहयोग नगर सं. पतसंस्थेत घडलेला प्रकार अगदी ताजा आहे.

या शिवाय यवतमाळातील कर्मिक्षा निधी (बँक) आणि कलकाम रियल इन्फ्रा कंपनीने ग्राहकांना वेगवेगळे आमिष दाखविले, यातून लाखो रूपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रार या बँकांशी संबंधीत नागरिकांनी केल्या आहे. त्यामूळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

यापूर्वीही जिल्ह्यात अनेक बँकांनी नागरिकांना गंडा घातला. त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, आयुष्याची पुंजी आपल्या किंवा कुटुंबीयांच्या अडचणीत कामी येईल, या आशेने नागरिक गुंतवणूक करतात, मात्र काही मोजके ‘ठग’ याचा फायदा घेवून नागरिकांची लुट करीत असल्याचे समोर येत आहे. काही नामांकीत बँका नागरिकांना मदत करतात तर काही दिशाभूल करतात. त्यामूळे आता ग्राहकांनी सतर्क राहणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात अनेक घटना वारंवार घडूनही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे योग्य खबरदारी घेवूनच गुंतवणूक करावी असा सल्ला जाणकार देत आहेत.

अनेक गुन्हे तपासाअंती न्यायप्रविष्ट
राळेगाव महिला ग्रामिण, यवतमाळ संत गाडगे बाबा, ढोकेश्वर मल्टिस्टेट मल्टीपर्पल, आर्णी भगवंत सहकारी पतसंस्था, घाटंजीतील सहयोग नगर सं. पतसस्था, महिला बँक यासह काही वित्तीय संस्थांवर पोलिसांत गुन्हे नोंद आहे. यातील काही प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण तपास पूर्ण करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले आहे. तर सध्या महिला बँकेचा तपास आर्थीक गुन्हे शाखा करीत आहे.

ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या
इंटरनेटवरून ऑनलाईन बँकिंग करताना पासवर्ड कुणालाही सांगू नका. इंटरनेटवरील ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर लॉग आऊट व्हायला आणि हिस्ट्री क्लीअर करायला विसरू नका. पेटीएम किंवा इतर अॅपवरून कोणतेही आर्थीक व्यवहार करतांना सावधगिरी बाळगायला हवी. बँकेचे अॅप असेल तर मोबाईल कुणाच्याही हातात देऊ नका. मोबाईल मधील अॅप हे नेमके लॉक असावेत. त्यासाठी पासवर्डचा वापर करावा.

अशा प्रकारे हाेते ऑनलाइन फसवणूक
्रत्येकजण आधुनीक उपकरणांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या उपकरणे हाताळण्याच्या अर्धवट ज्ञानात बऱ्याचदा आपल्या पायावर दगड मारुन घेण्यासारखे प्रकार घडत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मोबाइलवर बँकेतुन बोलत असल्याची बतावणी करुन नागरिकांच्या बँक खात्यातून पैसा लंपास करणे. मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा असे सांगत ग्राहकांनी फसवणूक करण्यात येते

बँक आणि पतसंस्था बुडण्याचे नेमके कारण
संचालक मंडळाची देखरेख राहत नाही, व अतिरिक्त कर्ज पुरवठा केला जातो, वेळोवेळी कर्ज वसुली होत नाही, जे संचालक मंडळ असतात, ते ओळखींच्यानाच कर्ज देतात. त्यामूळे कर्ज वसुली होत नाही. नियोजनाचा अभाव, वेळोवेळी मिटींग घेतली जात नाही, कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव, शासन, आरबीआय आणि सहकार खात्याकडून दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन होत नाही.

बातम्या आणखी आहेत...