आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारव्हा पोलिसांची कारवाई:दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांवर गुन्हे ; गोळीबार चौकातून एकाला ताब्यात घेत पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरोड्याच्या तयारी असणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ही कारवाई दारव्हा शहरातील गोळीबार चौकात बुधवार, दि. ३१ ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी चारचाकी वाहनासह धारदार शस्त्र असा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख अरवेज आयुब (२२) रा. रामरहीम नगर, यवतमाळ असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव असून शेख इरफान शेख मेहमूद (२१) आणि इमरान दिलावर खान (२०) दोघेही रा. यवतमाळ अशी फरार झालेल्या दोघांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारव्हा पोलिस शहरात पेट्रोलिंग करीत होते. गोळीबार चौकात चारचाकी कार क्रमांक एमएच-२९-एएफ-९५८ ही पोलिसांना संशयितरित्या आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी वाहनाजवळ जावून चौकशी केली. यावेळी पोलिसांना बघून दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला तर एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत पोलिसांनी चारचाकी वाहन, तीन मोबाईल, एक स्क्रूड्रायव्हर, लोखंडी हतोडा, धारदार चाकू आणि तलवार असा एकूण १ लाख ७६ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे तिन्ही युवक दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर दारव्हा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. तर उर्वरीत फरार असलेल्या दोघांचा पोलिस शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...