आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हे

पुसद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामिण पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या वालतुर तांबडे येथील शेतशिवारात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाद निर्माण केला. स्वतःच्याच शेतात जाण्यापासून रोख़ून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोबतच विष औषध प्राशन करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्याविरोधात मंगळवार, दि.२१ जून रोजी चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुंगशी येथे राहणाऱ्या प्रेम सिंग नामदेव राठोड वय ५० वर्षे आणि त्यांच्या दोन साथीदार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वालतुर तांबडे येथे राहणारा संदीप रमेश पवार वय २७ वर्षे या युवकाने तक्रार दिली आहे. ग्रामीण पोलिस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेम सिंग राठोड याने त्याच्या दोन साथीदारांसोबत संगनमत करून संदीप पवार याच्यासोबत रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वाद निर्माण केला. त्यानंतर आरोपींनी संदीपला शेतात जाण्यापासून रोखले. आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तू जर शेती केली, तर विषारी औषध प्राशन करून खोट्या गुन्ह्यात अडकवितो, अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...