आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:उमरगा बसस्थानकात गर्दीत चोरांचा वाढता वावर; पोलिसांचे दुर्लक्ष ; पंधरा दिवसांत अडीच लाखांचा ऐवज व रोख पन्नास हजार लंपास

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली लालपरी शहरासह ग्रामीण मार्गावरील रस्त्यावर धावत आहे. बसस्थानकात प्रवाश्यांची गर्दी वाढली असून या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरट्याचा वावर वाढला आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उमरगा शहरातील बसस्थानकात दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. सण, उत्सव व लग्नसमारंभ येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रीय झाले आहेत. पंधरा दिवसापूर्वी एका महिलेच्या हँड बॅगमधून तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच शहरातील एका व्यापाऱ्याचे ५० हजार रुपये अज्ञात चोरट्या लांबवले होते. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा शहरात नेहमीच राज्य व परराज्यातील नागरिकांची संख्या अधिक असते, त्यामुळे बसस्थानकात ग्रामीण आणि विविध राज्यातून येणाऱ्या एसटी बसची संख्याही अधिक आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कुचकामी ठरलेल्या उमरगा बसस्थानकात चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या महिन्यापासून बसस्थानकात चोरांचा वावर वाढला असून दिवसांतून एक चोरी होत आहे. दोन दिवसापूर्वी उमरगा-लातुर बस स्थानकात आली असताना बसमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवाशी गडबडीत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले तर याच वेळी एकाचा खिसा कापून दीड हजार रुपये लांबवले होते. बसस्थानकात चोरीच्या घटना वारंवार घडत असताना पोलिस कुचकामी ठरत आहेत. बसस्थानकामध्ये पोलिस चौकी आहे पण चौकीत पोलिस नसल्यामुळे चोऱ्या वाढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...