आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले असून पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अपेडा या कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेच्या माध्यमातून भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला जगभर आणखी प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त धोरण तयार केले आहे. यात प्रामुख्याने नाचणी, ज्वारी व बाजरी पिकांचा समावेश असून या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. तसेच भरडधान्यातील पोषणमूल्ये व आहारातील महत्त्व पटवून देत देश-परदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात तिन हजार हेक्टरवर तृण धान्याची लागवड असून यात वाढ होण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. नूडल्स, बिस्किटे, तयार पदार्थ, मिठाई यासारख्या रेडी टू ईट आणि रेडी टू सर्व्ह श्रेणीतील पोषण-मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार स्टार्ट-अप्सनादेखील एकत्रित करत आहेत.
यवतमाळ तसेच विविध जिल्ह्यांत यातील ज्वारी, बाजरी, राजगिरा आदी पिके घेतली जातात. यातील ज्वारी, बाजरी ही पिके खरीप व रब्बी दोन्ही हंगामात येतात. यातही विदर्भ हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे व पुरेशा सिंचन सुविधा नसल्याने हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर असतो. यामुळे फळ बागायतदारच नव्हे तर हंगामी पिके घेणारे शेतकरीसुद्धा आपला शेतमाल देश-परदेशात नेऊन विक्री करू शकतात.
गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्यास भावही चांगला
जिल्ह्यातील तृण धान्याची सरासरी लागवड ३ हजार हेक्टरवर असून २०२२ तृण धान्याची लागवड झालेली आहे. यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्यास त्यास बाजारात भावही चांगला मिळतो. - नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.