आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:शेतकरी कन्येची पर्यावरण रक्षणासाठी सायकलस्वारी, यवतमाळची प्रणाली राज्यभरात सायकलने करणार भ्रमंती

भंडारा / प्रशांत देसाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत चाललेले प्रदूषण, मानवाची उपभोगवादी जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेले पर्यावरण यामुळे जीवनसृष्टीचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण संवर्धन, समाजजागृतीसाठी थेट यवतमाळ येथील एक शेतकरी कन्या राज्यभरात सायकलने भ्रमंतीसाठी निघाली आहे. ही कन्या शहरात दाखल होताच भंडाराकरांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले.

प्रणाली उर्फ बेबी विठ्ठल चिकटे असे या शेतकरी कन्येचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातील ही प्रणाली आता अवघ्या महाराष्ट्राला पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देत आहे. बीएसडब्ल्यूपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या प्रणालीला सामाजिक कार्याची जिज्ञासा होती. सध्या सर्वत्र वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल झालेला आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. गाव असो वा शहर सर्वत्र सिमेंटीकरणाला महत्त्व आल्याने जलस्राेतातही मोठी घट आली. प्रणाली ही पर्यावरण संतुलन राखता यावे यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकलने थेट यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट या गावातून ४ ऑक्टोबरला निघाली आहे. ती राज्यातील कानाकोपऱ्यातील गावांमध्ये, शहरांमध्ये भेटी देत अवघा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. दररोज किमान ५० ते ६० किमीचा प्रवास करून जमेल तिथे मुक्काम करणे आणि ग्रामस्थांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संदेश देणे असा प्रणालीचा प्रवास सुरू आहे.

तर भविष्यात जीवसृष्टी नष्ट हाेईल
ऋतुचक्र बदलत चाललेले आहे. याच्या जनजागृतीसाठी ती घराबाहेर पडली आहे. गाड्यांच्या अतिवापरामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवताहेत. त्यामुळे गाड्यांचा कमी वापर करून सायकलचा वापर करावा. सोबतच इतरांना सांगण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करावी या माध्यमातून सायकलस्वारी राज्यभरात सुरू केली आहे. त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रणाली चिकटे, सायकलस्वार-पर्यावरणप्रेमी.

बातम्या आणखी आहेत...