आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 हजार‎ रुपयांचे साहित्य जळून खाक:दोन जणांनी वरुड‎ शेतशिवारात आग‎ लावल्याने नुकसान‎

पुसद‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड येथील शेत शिवारात अश्वीनपूर‎ तांडा येथील दोघांनी संगनमत करून‎ आग लावली. या आगीत ७५ हजार‎ रुपयांचे साहित्य जळून खाक झाले‎ आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने दिलेल्या‎ तक्रारीवरून दोघांवर गुन्हे नोंदवले.‎ सुगराव सावडा राठोड वय ५५‎ रा.अश्वीनपूर तांडा (वरुड) यांच्या‎ तक्रारीवरून गावातील विक्रम संजय‎ राठोड व त्याच्या एका‎ साथीदाराविरोधात गुन्हा दाखल‎ करण्यात आला. दोन्ही आरोपींनी‎ संगनमत करून आग लावल्याने‎ शेतातील ठिबक सिंचनाचा ४१ हजार‎ रुपयांचा सेट, स्प्रिंकलरचे दहा पाइप,‎ दोन सागाची झाडे, गव्हाच्या तीन‎ पाट्या असा एकूण ७० हजार पाचशे‎ रुपयांचा तर त्यांच्याच शेताशेजारी शेत‎ असलेल्या कौशल्याबाई राठोड यांच्या‎ शेतात उभे असलेल्या गव्हाच्या पाच‎ हजार रुपयांच्या तीन पाट्या जळून‎ खाक झाल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...