आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागून शेती साहित्यासह कापूस जळून खाक झाला आहे. आगीमध्ये शेतकऱ्यांचे १ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गजानन राऊत यांनी अमडापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीत म्हटले, शेतामध्ये गोठा असून गोठ्यामध्ये ठेवलेली शेती उपयोगी अवजारे, शेतातील माल, वीस टीनपत्रे व कापूस ठेवलेला होता. १० मे रोजी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये १ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.