आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या या आत्महत्या:पुसद येथे सायकल पार्किंगमध्ये‎ आढळला मृतदेह; चर्चांना ऊत‎

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलसिंग नाईक‎ महाविद्यालयाच्या सायकल‎ पार्किंगमध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीचा‎ मृतदेह शनिवारी सकाळी ११ वाजता‎ आढळून अाला. रमेश संभाजी कांबळे‎ वय ३८ रा. आझाद चौक असे त्या‎ मृतकाचे नाव आहे.‎ शहरातील फुलसिंग नाईक‎ महाविद्यालयाच्या सायकल‎ पार्किंगच्या आवारात एक मृतदेह‎ असल्याची माहिती शहर पोलिसांना‎ मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता‎ शहर शहर ठाण्यातील अधिकारी,‎ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत‎ पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा‎ शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल‎ करण्यात आल्यावर ओळख‎ पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत‎ व्यक्ती विवाहित असून पत्नीसोबत‎ पटत नसल्यामुळे पत्नी माहेरी राहत‎ होती. एक मुलगी सुद्धा त्या व्यक्तीला‎ असल्याचे समजते. या घटनेचा‎ अधिक तपास शहर ठाणेदार शंकर‎ पांचाळ करत आहे.‎