आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट कार्ड:ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्ड नोंदणीस अंतिम मुदतवाढ, विद्यार्थ्यांसह इतरांना दिलासा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या विविध सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १ जूनपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक होते. त्यामुळे ३१ मेपर्यंत रोजी स्मार्ट कार्ड काढून घेणे अनिवार्य होते. मात्र, मंगळवारी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह अन्य सवलत धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, अधिस्वीकृतीधारक अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २०१८-१९ मध्ये सवलत धारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. ती लागू झाल्यानंतर विना कार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही प्रवास सवलत देण्यात येणार नाही, असेही महामंडळाने जाहीर केले आहे.

यापुढे मुदतवाढ नाही १ जुलैपासून एसटी प्रवास सवलत घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. आतापर्यंत अनेकदा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली. तरी ही मुदतवाढ अंतिम असल्याचे महामंडळाकडून जाहीर केले आहे. विभागामध्ये आतापर्यंत १२ हजार ३७५ कार्डची नोंदणी झाली आहे. यापैकी ११ हजार ९९७ कार्डचे वितरण झाले आहे. तर १ हजार २०९ कार्ड विभागामध्ये पडून आहेत.

बातम्या आणखी आहेत...