आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय:बाळाचा उपचाराअभावी मृत्यू; नातेवाइकांची चौकशीची मागणी

पांढरकवडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

च्या प्रसूतीसाठी एकही जबाबदार व्यक्ती रुग्णालयात हजर नसल्याने नातेवाईकांनीच पुढाकार घेत तिची प्रसूती केल्यानंतर जन्मास आलेल्या नवजात बाळाला वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा १५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ही गंभीर घटना उपजिल्हा रुग्णालयात घडली असून याबाबत मृत पावलेल्या नवजात बाळाच्या वडिलांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.

शहरातील राणाप्रताप वॉर्डातील विजय उत्तम शेंडे यांनी त्यांची पत्नी गरोदर असल्याने तिला प्रसूतीकरिता १२ ऑगस्टला रात्री ९.४० वाजता दरम्यान भरती केले. यावेळी रुग्णालयात जबाबदार परिचारिका उपस्थित नसल्याने गरोदर महिलेसोबत आलेल्या एका महिला नातेवाईकांनीच तिची प्रसूती केली. प्रसूतीनंतर दोन दिवस उपजिल्हा रुग्णालयात त्या नवजात बाळाची तथा तिच्या आईची संबधित डॉक्टरांनी तपासणी केली नाही. तर १४ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता दरम्यान त्या नवजात बाळाची तपासणी करून एक इंजेक्शन देण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला सकाळीच ७ वाजता दरम्यान त्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयात जबाबदार परिचारिका उपस्थित नसणे, प्रसूती नंतर दोन दिवस बाळाची व आईची तपासणी न करणे तथा नवजात बालकास इंजेक्शन दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होणे हे सर्व प्रकार संशयास्पद तथा बेजबाबदारपणाची असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मृत नवजात बाळाच्या वडिलांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.

एका नवजात बालकाचा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टरांचे शहरात मोठ, मोठे रुग्णालय थाटून प्रायव्हेट प्रॅक्टीस सुरू आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने येथील यंत्रणा फक्त ओपीडी पुरतीच मर्यादीत असल्याचा आरोप आता रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...