आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिगाव प्रकल्प:प्रकल्पाच्या कामात झोकून दिल्याने‎ नक्कीच यश मिळते‎

खामगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिगाव प्रकल्पाचे काम करत‎ असताना विभागातील अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांची योग्य साथ मिळाल्याने‎ काम प्रगतीपथावर जात आहे.‎ अधिकारी व कर्मचारी त्यांच्या‎ परिवाराकडे दुर्लक्ष करीत कामात‎ व्यस्त असतात. प्रकल्पाच्या कामात‎ पूर्णतः झोकून दिल्याने नक्कीच यश‎ मिळते असे प्रतिपादन जिगाव‎ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता‎ श्रीराम हजारे यांनी केले. जलसंपदा‎ विभाग खामगाव येथील कार्यरत‎ उपकार्यकारी अभियंता‎ एन.व्ही.राजपूत, शाखा अभियंता‎ राजकुमार हरगुणानी यांचा नियत‎ वयोमानानुसार सेवानिवृत्त तर वरिष्ठ‎ लेखाधिकारी आर.डी.खंडारे यांची‎ बदली झाल्याने त्यांचा जिगाव उपसा‎ सिंचन विभागाच्या वतीने त्यांनी‎ दिलेल्या सेवेबद्दल सेवागौरव‎ समारंभ स्थानिक पाटबंधारे वसाहत‎ येथे ३० डिसेंबर रोजी आयोजित‎ करण्यात आला होता.‎

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ जिगाव धरण व पुनर्वसन विभागाचे‎ कार्यकारी अधिकारी श्रीराम हजारे‎ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गुण‎ नियंत्रण विभागाचे कार्यकारी‎ अभियंता सुनील राठी तर सुमनबाई‎ राजपूत, मंजूषा राजपूत, रुक्मिणी‎ हरगुणानी उपस्थित होते. यावेळी‎ उपकार्यकारी अभियंता‎ एन.यू.राजपूत, शाखा अभियंता‎ राजकुमार हरगुणानी,‎ आर.डी.खंडारे यांचा कार्यकारी‎ अभियंता श्रीराम हजारे यांच्या हस्ते‎ सत्कार करण्यात आला. पुढे‎ बोलताना श्रीराम हजारे म्हणाले की,‎ उपकार्यकारी अभियंता राजपूत व‎ शाखा अभियंता हरगुणानी यांनी‎ त्यांच्या सेवाकाळात कधीही‎ कामचुकारपणा केला नाही.

त्यांचे‎ नेहमीच योगदान राहीले. त्यामुळे‎ जिगावच्या यशात भविष्यात‎ दोघांचेही नाव दिसून येईल असा‎ विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक‎ उपविभागीय अभियंता ब्रम्हानंद‎ गावंडे यांनी तर उपविभागीय‎ अधिकारी विजय चोपडे, सुभाष‎ निखाडे, सुरेंद्र जाधव तसेच संजय‎ हरगुणानी, डॉ.सोनाली हरगुणानी,‎ गजेंद्रसिंह राजपूत, देवराज राजपूत,‎ संजय खांडे, गणेश तिडके‎ यांच्यासह इतर मान्यवरानी मनोगत‎ व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना‎ एन.यू.राजपूत, राजकुमार‎ हरगुणानी, आर.डी.खंडारे यांनी‎ अनुभव व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...