आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोळसा वाहतुकीच्या वाहनांकडून पथकर वसूल करता यावा, याकरिता हेतुपुरस्सरपणे शहरालगत टोल नाका उभारण्यात आला. हा टोल नाका सुरुवाती पासूनच वादग्रस्त ठरला आहे. वाहतुकीची होणारी कोंडी व अपघाताच्या वाढलेल्या घटनांमुळे हा टोल नाका शहरापासून दूर हलवण्याच्या मागणीने ही मध्यंतरी जोर पकडला होता. आता युवा सेनेने हा प्रश्न उचलून धरला असून अपघाताला कारणीभूत ठरू पाहणारा हा टोल नाका शहरापासून दूर हलवण्याची मागणी केली आहे.
या टोल नाक्यावर वाहनाच्या रांगा लागत असल्याने नेहमी या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावलेली असते. छोट्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून वाहने चालवावी लागत आहे. या टोल नाक्यावर नेहमी वाहनांची वर्दळ राहत असल्याने अंतर्गत वाहतूक प्रभावित होत असून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या व प्रश्नांना घेऊन नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या युवा सेनेने आता नागरिकांचे जीव धोक्यात आणणारा टोल नाका येथून हटवण्याची मागणी केली आहे. युवा सेनेचे यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी केली आहे.
वणी ते पडोली व वणी ते कारंजी पर्यंतच्या रस्ता बांधकामाचे कंत्राट आयव्हीआरसीएल कंपनीला मिळाले. वणी ते पडोली पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करून सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. तर वणी ते कारंजी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्ते तयार केल्यानंतर आरव्हीसीएल कंपनीने पडोली ते कारंजी मार्गावर तीन टोल नाके उभारले. पडोली वरून यवतमाळ कडे जाणाऱ्या वाहनांना या तीनही टोल नाक्यांवर पथकर द्यावा लागत आहे. मागील पाच वर्षांपासून हे टोल नाके टोल वसुलीचे काम करीत आहे. या कंपनीने बांधलेल्या रस्त्यांना ठिकठिकाणी तडे गेले आहेत.
काही ठिकाणी तर रस्त्यांवर खड्डे देखील पडले आहेत. रस्ता दुरुस्ती व देखभालीच्या कामांकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने रस्त्याची दुरावस्था होऊ लागली आहे. रस्त्याच्या कडेला प्रचंड झाडे झुडपे वाढल्याने वळण घेतांना समोरील वाहन दृष्टीस पडत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.