आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित बहुजन आघाडीचे एसडीपीओंना निवेदन:ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याची मागणी

पुसद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कारला देव येथील आरोपी विरोधात रविवार, दि. २४ जुलै रोजी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल झाले आहे. त्या नऊ आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार, दि. २७ जुलै रोजी एसडीपीओला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कारला देव येथील आरोपी विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट ३५४ नुसार नोंद असलेले नऊ आरोपीला चार दिवस होऊनही ग्रामीण पोलिसांनी अटक केले नाही. कारला देव येथे होलगर समाजांतील लग्न असल्याने शनिवार, दि.२३ जुलै रोजी रात्री डीजेमध्ये गाणे वाजविले होते. ते गाणे बंद करण्यासाठी सरपंचासह आठ आरोपींनी संगणमत करून वाद निर्माण करीत डिजे बंद केला. त्यानंतर लाठीकाठीने बेधुंद हाणामारी झाली.

दरम्यानच्या वेळेला जातीवाचक शिवीगाळ केली. सोबतच जीवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली. या कारणावरून ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये रविवार, दि. २४ जुलै रोजी विविध कलमासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केला. चार दिवस झाले, परंतु आरोपीला अटक केले नाही. त्यामुळे दाखल गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना बुधवार, दि. २७ जुलै रोजी निवेदन देऊन केली आहे.

बातम्या आणखी आहेत...