आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचबर्डी येथील प्रकार:निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ; गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

जवळा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील गट ग्रामपंचायत बारभाई अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक ०२ चिंचबर्डी येथे पंधराव्या वित्त आयोगातून सुरु असलेल्या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आर्णी तालुक्यातील मौजा चिंचबर्डी येथे अंगणवाडी दुरुस्ती, पाणी पुरवठ्याची वाढीव पाइप लाईन, नाल्यावरील रपटे इत्यादी विकासकामे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत आहे. पण हे सर्व कामे निकृष्ट दर्जाची, इस्टिमेटनुसार कोणत्याही बाबीची पूर्तता न करता, थातूर- मातूर पद्धतीने करून शासकीय मलिदा लाटण्याचे काम कंत्राटदार करित आहे. याबाबतची तक्रार दि. ८ सप्टेंबरला ग्रामपंचायत बरभाई येथील ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना दिली. संबंधित कामाची सखोल चौकशी करुंन दोषीवर कारवाई करून, या कामाच्या अदा करण्यात आलेल्या देयकाची वसुली करण्यात यावी, अशी मागणी या ग्रामपंचयात सदस्यांनी केली आहे. यावेळी आकाश राठोड, शंकर पवार, सपना राठोड, जया जाधव ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अन्यथा उपोषणाला बसणार
गावकरी व ग्रामपंचायत सदस्य यांनी सरपंच व सचिव यांना विचारले. तुम्ही व्यवस्थित काम का करत नाही तर सरपंच हे उडवा उडवीचे उत्तरे देउन ‘तुम्ही माझे काहीही करू शकत नाही’ मी माझ्या मर्जीनुसार काम करणार अशी धमकी देतात. अशा या भ्रष्ट सरपंच (ठेकेदार) यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला उपोषणास बसावे लागेल.
- आकाश राठोड, समाजिक कार्यकर्ता चिंचबर्डी.

बातम्या आणखी आहेत...