आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारेगाव:बोंडअळीने झालेल्या हानीचे पैसे खात्यात जमा करा

मारेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळीचे पैसे अजुन पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले नाही. ही रक्कम त्वरित जमा करावी अशी मागणी निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात छावा क्षात्रवीर सेनेच्या विदर्भ अध्यक्षा प्रतिभा तातेड़ यांनी संबधित तलाटी यांच्या कार्यलयात भेट घेतली असता, त्यांनी तहसील कार्यलयात यादी पाठवली आहे असे सांगण्यात येत असल्याचे सांगितले. तहसीलमधे तहसीलदार यांच्या सोबत चर्चा करून तहसीलदार यांना छावा क्षात्रवीर सेनेने निवेदन दिले. शेतकरी पहीलेच मोठ्या अडचणीत आहे. त्यातही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पाठवावे अशी मागणी छावा क्षात्रवीर सेनेतर्फे तहसीलदार यांना केली आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी, संगिता डाहुले, प्र उपाध्यक्ष विशाखा राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा तातेड़, विदर्भ अध्यक्ष विलास बुरान, कामगार सेना विदर्भ उपाध्यक्ष विनोद आवारी, जिल्हा अध्यक्ष राजू जुनगरी, तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर यांच्या नेतृत्वात सतीश पारखी, संतोष दानखेड़े, अजय धांडे,पृथ्वीराज घोटेकर, अभिषेक उपरे,पांडूरंग अवताड़े, गजानन लांबट, संकेत लांबट, नंदू लोडे, व शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...