आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद:ढाणकीत महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी, मनसेचा रास्तारोको

ढाणकी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छ. शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी, वंचित, मनसेने बुधवारी ढाणकीत कडकडीत बंद पाळला. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

जुने बसस्थानक चौकात बुधवारी सकाळी ८ वाजेपासूनच सहभागी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यावर ठिय्या मांडला. रस्त्यावर भरवलेल्या सभेत काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष बंटी जाधव, संभा गोरटकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे, देवानंद पाईकराव, बरडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल तुपेकर, संजय घुगरे, राजेश घुगरे, यांनी निषेध नोंदविला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नैतिक जबाबदारी समजून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि राज्यपालांनाही केंद्र सरकारने माघारी बोलवावे, अशी मागणी लावून धरली. या चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावरच हल्ला चढवत गद्दारी व गनिमी पद्धतीने आलेले हे सरकार फार दिवस टिकणार नसल्याचे मत व्यक्त केले.

महापुरूषांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी ढाणकीतील व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने दिवसभर बंद ठेवली. यावेळी ढाणकी-बिटरगाव रस्त्यावर रास्तारोको केले. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहने अडवली. तद्नंतर बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी कार्यकर्त्यांना स्थानबंद करून पोलिस चौकीत हलविले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिटरगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रताप भोस, पोलिस उप निरीक्षक कपिल मस्के, मोहन चाटे, निलेश भालेराव, गजानन खरात, अतिश जरांडे, सतीश चव्हाण आदी पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्तासाठी तैनात होती.

यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, रामराव गायकवाड, बंटी जाधव, शिवाजी फाळके, संभा गोरटकर, गणेश नरवाडे, अमोल तुपेकर, जॉन्टी विणकरे, संतोश जोगदंडे, संबोधी गायकवाड, देवानंद पाईकराव, विश्वास धुळे, रमेश पराते, शेख इरफान, अमोल पाटील यांच्यासह इतरही नागरीक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...