आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालय पुसद येथे सभासद नोंदणी व पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पक्ष निरीक्षक मोहन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद नोंदणी कार्यक्रम पुसद येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्ष निरीक्षक मोहन राठोड, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा महासचिव डी. के. दामोदर व जिल्हा संघटक राजकुमार ताळीकोटी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुकाध्यक्ष बुद्ध रत्न भालेराव यांनी मांडली. तर संचालन शाखाध्यक्ष संदीप मनोहर, आभार प्रदर्शन तालुका महासचिव उत्तमराव मस्के यांनी केले. कार्यक्रमाला पुसद शहर, तालुका व शाखांचे पदाधिकारी तसेच गाव खेड्यातून वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माधवराव मनवर तालुका सहसंघटक, तालुका उपाध्यक्ष प्रकाश खिल्लारे, मिलिंद पठाडे, गौतम वाहुळे, प्रदीप वाहुळे, विक्की उबाळे, शंकर करमनकर, ज्ञानेश्वर मनोवर, सरपंच हिवळणी मधुकर सोनोने, भैय्यासाहेब जोगदंडे, विक्रम राठोड, ऋतिक गडधने, अशोक जोगदंडे, करण जोगदंडे, अक्षय खिल्लारे, राहुल कांबळे, शेख विक्रम शेख अजीज, मोसिन खान, शिलानंद कांबळे, राहुल धुळे, वैभव सूर्यवंशी, देवानंद डोंगरे, अमोल धुळे, राहुल जोगदंडे, विकी चंदन, विशाल उबाळे, मोहन जाधव, गौरव बावसकर, नागेश गायकवाड, निखिल गावंडे, सुमित पाईकराव, अशोक बलखंडे कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.