आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉक्टरची दोन कोटीने फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय अनन्या सिंग ओबेरॉस उर्फ संदेश मानकर या तरुणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून फसवणूक आणि आत्महत्या अश्या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशातच एका सामाजीक संघटनेने अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपमहानिरिक्षक मिना यांनी गुरुवारी यवतमाळ गाठून पोलिस अधीक्षक कार्यालयात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत सखोल तपास करण्याचे निर्देश एसपी डॉ. भुजबळ यांना दिले. यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीत राहणाऱ्या बारावी पास संदेश मानकर या तरुणाने अनन्या सिंग ओबेरॉय नावाने वर्षभरापूर्वी एका बनावट फेसबुक अकाऊंट उघडले होते. अशात दिल्लीतील उच्चशिक्षीत डॉ. गोयल यांची संदेशच्या बनावट फेसबुक अकाऊंट (अनन्या सिंग ओबेरॉय) वर मैत्री झाली. यावेळी स्वत:च्या बहिणीचे अपहरण झाल्याची बतावणी संदेशने डॉ. गोयल यांना केली. त्यामुळे बहिणीला वाचवण्याकरता दोन कोटीची आवश्यकता असल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. गोयल यांनी दिल्लीतून दोन कोटीची रक्कम घेवून थेट यवतमाळ गाठले. त्यानंतर संदेशने इस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट आणि नंबर बंद करीत डॉ. गोयल यांच्याशी संपर्क तोडला होता. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने अवधुतवाडी पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनन्या सिंग ओबेरॉस उर्फ संदेश मानकर याला ताब्यात घेत कोट्यवधींची रोख जप्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण करीत संदेशची कारागृहात रवानगी केली होती. अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक काही दिवसापूर्वीच संदेश यवतमाळ कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. अशातच त्याने दारव्हा मार्गावर असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या जसराणा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू होता. अशात एका सामाजीक संघटनेने अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांची भेट घेत सदर पैसे हवालामार्फत आल्याने त्या दिशेने तपास करण्यात यावा, रक्कम मोठ्या प्रमाणात असून त्याचीही चौकशी करावी तसेच संदेश याने आत्महत्या केली की, त्याचा घातपात करण्यात आला. याबाबतही चौकशीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी पोलिस उपमहानिरिक्षक मिना यांनी यवतमाळ गाठून एसपी कार्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांच्याकडून तपासाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.