आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीची कारवाई:इंजिनिअर तरुणाच्या वाहनात आढळला देशी कट्टा

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशी कट्टा बाळगणाऱ्या एका सिव्हील इंजिनिअर तरूणाला एलसीबीने ताब्यात घेवून त्याच्या वाहनातून देशी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार, दि. २० नोव्हेंबरला मोठे वडगाव परिसरातील धर्माजी नगर येथे करण्यात आली. उमेश म्हातारमारे वय ३० वर्ष रा. धर्माजी नगर असे ताब्यात घेण्यात आलेल्या सिव्हील इंजिनिअर तरूणाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील मोठे वडगाव परिसरातील धर्माजी नगर येथील उमेश म्हातारमारे या तरूणाकडे देशी कट्टा असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यावरून रविवारी एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धर्माजी नगर गाठून सिव्हील इंजिनिअर असलेल्या उमेश याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच-४३-एल-०२३१ मधून देशी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, विवेक देशमुख, पथकातील विनोद राठोड, रजनीकांत मडावी, निखिल मडसे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...