आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टा जप्त:मुखरे चौकातील गोळीबार प्रकरणातील देशी कट्टा जप्त

पुसद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेला देशी कट्टा पोलिसांनी जप्त केल्याचा दावा केला आहे. गोळीबारात वापरलेले देशी बनावटीचे अग्नि शस्त्र तीन जिवंत काडतुसांसह हत्ती फुलाजवळील नदीकाठी असलेल्या शेतातून हरिश नामक व्यक्तीच्या कबुली वरून जप्त करण्यात आले आहे.

मुखरे चौकात जुन्या वादावरून विशाल घाटे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारातील आठ जणांपैकी महेश उर्फ किर्ती रावल, सौरभ मडके, शेख शाकीर शेख रऊफ या तिघाला तात्काळ अटक करण्यात आले होते. उर्वरित पसार झालेल्या पाच जणांपैकी अमन खान समीउल्ला खानला वाशीम जिल्ह्यातील रुई गोसता येथून एलसीबी पथकाने अटक केली. गोळीबारात वापरलेले देशी बनावटीचे अग्नि शस्त्र तीन जिवंत काडतुसांसह हत्ती फुलाजवळील नदीकाठी असलेल्या शेतातून हरीष याच्या कबुली वरून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...