आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारव्हा शहरातील अंबिका नगरात नगरपालिकेच्या निधी अंतर्गत रस्ते व नाल्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे अर्धवट असल्याने अनेकदा नगर परिषद बांधकाम विभागाला अर्धवट कामे पूर्ण करून देण्याकरिता सांगण्यात आले असून अद्यापही रस्ता अपूर्णच असल्याने नगरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याकरिता शुक्रवार दि. ३ जून रोजी अंबिका नगरातील काही नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. शहरातील अंबिका नगरातील बुद्ध विहाराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राम नवमी अशा विविध मिरवणुकी जाण्याचा हा रस्ता आहे. गेल्या सहा महिन्यापासून नाल्यांचे व रस्त्यांचे अर्धवट काम करून काम बंद असल्याने कामाकरता वापरण्यात येणारे गिट्टी, चूरी इत्यादी साहित्यांची रस्त्यात ढीग रचून आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. नगरपालिका बांधकाम विभागाला या करिता वारंवार सूचना देऊनही बांधकाम विभागाकडून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पुढील येणाऱ्या पावसाळ्यात नाल्यांच्या व रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी जाण्याची दाट शक्यता आहे असे निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे. प्रशासन लक्ष देईल का याकडे आता अंबिका नगरातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहे यावेळी संदीप शिले, स्वप्निल राठोड,रत्नेश इंगोले, पवन बलखंडे, गिरीश कल्याणकर, परेश मनवर, स्वप्नील मापारे नागरिक निवेदन देण्याकरिता उपस्थित होते..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.