आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोकस:केळापूर तालुक्यात विकास हरवला; वीज, रस्ते, पाण्याची समस्या कायम; स्थानिक राजकारणी फक्त गटबाजीत व्यस्त, अनेक युवक बेरोजगार

पांढरकवडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या अजूनही ‘जैसे थे’ असून, याला स्थानिक राजकारण जबाबदार ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. परिणामी, ग्रामीण भागात अद्याप विकासाची प्रतीक्षा कायमच आहे. सोबतच येथे कोणतेही मोठे उद्योग धंदे नाही यामुळे अनेक युवक बेरोजगाराची सामना करीत आहे.

यासोबतच केळापूर तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते, वीज, आरोग्य, पाणी या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना न करता, केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र,यासमस्यांवर राजकारण करण्यातच ही मंडळी धन्यता मानतात. गावातील समस्या सोडवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. गावांतील समस्यांची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे.

मात्र, योजनांची नीट अंमलबजावणी होत नसल्याची ओरड आहे. ग्रामपंचायतींना भक्कम असे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरपंचपदी बसणारी व्यक्ती प्रभावशाली झाली आहे. ग्रामस्थांची त्यांना किती कळकळ आहे, यावरून विकासाची दिशा ठरते. परंतु, ग्रामीण भागात असलेल्या समस्या बघता, त्या कमी होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अतिक्रमण, सांडपाण्याची समस्या, डासांचे प्रमाण अधिक होणे, नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा, विजेची समस्या, कधी कमी विद्युत दाब, तर कधी वीज खंडित होणे तसेच शेतात जाण्यासाठी व्यवस्थित पाणंद रस्ते नाही. विकासासाठी लोकसहभागाचीही गरज आहे तसेच स्थानिक लोक प्रतिनिधींनीही याकडे लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे, जेणेकरून केळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल.

त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. तालुक्यातील ग्रामीण भाग मूलभूत सुविधांपासून अद्याप अद्याप कोसोदूर असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...