आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिदिन‎:देवराव पाटील चोंढीकर‎ यांचा 36 वा स्मृतिदिन‎

पुसद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी शिक्षण संकुलाचे‎ आधारवड, जिल्हा परिषदेचे प्रथम‎ अध्यक्ष दिवंगत देवराव पाटील‎ चोंढीकर यांचा ३६ वा स्मृतिदिन‎ शिवाजी शिक्षण संकुलाच्या‎ प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती‎ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून‎ आदरांजली कार्यक्रम पार पडला.‎ याप्रसंगी आमदार रणजित पाटील,‎ दीपक आसेगावकर, प्राचार्य डॉ.‎ उत्तमराव रूद्रवार, ॲड. आशिष‎ देशमुख, माजी सहाय्यक पोलिस‎ आयुक्त शाम चव्हाण, माजी‎ आमदार विजय पाटील चोंढीकर,‎ रामभाऊ देवसरकर यांनी पूजन‎ करून आदरांजली अर्पण केली.‎

त्याचबरोबर श्री. शिवाजी माध्यमिक‎ व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री‎ शिवाजी अध्यापक विद्यालय,‎ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व‎ संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य,‎ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,‎ पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक,‎ शिक्षकेत्तर कर्मचारी, रा.से.यो. व‎ एन.सी.सी. चे विद्यार्थी तसेच‎ पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील‎ चोंढीकर याच्यावर प्रेम करणारे‎ असंख्य नागरिक यांनी आपली‎ आदरांजली अर्पण केली. बहारदार‎ संगीताच्या साथीने संगीत शिक्षक‎ सारंग कोरटकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी‎ गीतांमधून आदरांजली अर्पण केली.‎ स्मृती समारोह कार्यक्रमाचे संचालन‎ प्रा. गणेशराव रावते व प्रा. गजानन‎ जाधव यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...