आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाणीटंचाईविरोधात आज ढाणकी नगरपंचायतीवर धडक मोर्चा, धरणे; नियोजनाचा अभाव, तत्काळ उपाय योजना करा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

ढाणकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तीव्र पाणी टंचाईवर तत्काळ उपाय योजना करणे, घरकुल योजना तात्काळ राबवण्यासह अन्य मागण्यासाठी गुरूवार, दि. ५ मे रोजी आक्रोश मोर्चा, एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत लिपिक राजू दवणे यांना दिले.

दोन वर्षांपासून सरासरी पेक्षा अधिक पाऊस आहे. ढाणकी पासून काही अंतरावर असलेली पैनगंगा नदी पात्रातून पाणी वाहते. लाखो रुपये खर्चून पाइप लाईन टाकण्यात आली आहे. तरीसुद्धा योग्य नियोजनाअभावी नागरिकांना महिन्यातून दोनवेळा नळाला पाणी येत आहे. ढाणकी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. नगरपंचायत कडून तीव्र पाणी टंचाई विषयी तोडगा काढण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना होतांना दिसत नाही. यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. यासह नगरपंचायत स्थापन झाल्यापासून शहरात एकही घरकुल शासनाकडून आले नाही. शकडो नागरिक घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत.

रमाई, प्रधानमंत्री आवास योजना या दोन्ही घरकुल योजना राबवणे गरजेचे आहे. असे असतांना याविषयी सुध्दा नगरपंचायतीकडून कुठलीही हालचाल होतांना दिसत नाही. यामुळे येथील प्रशासनाच्या निषेधार्थ आक्रोश नागरिकांच्या लोक हिताच्या मागण्यासाठी नगरपंचायत मोर्चा काढून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी निवेदन देताना नगरपंचायत उपाध्यक्ष शेख जहीर जमीनदार, काँग्रेस शहराध्यक्ष अमोल तुपेकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव जॉन्टी विनकरे, स्वप्नील पराते, नगरसेवक संबोधी गायकवाड, बाळा करकले, शेख बशीर यासह इतरही नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...