आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ७ एप्रिल ते१४ एप्रिल पर्यंत पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात धम्म क्रांती प्रज्ञापर्व २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ एप्रिल रोजी आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उद्घाटक तर अध्यक्ष म्हणून पुसद विधान सभेचे आमदार इंद्रनील नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी एस. कार्तिकेयन, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकरडॉ. अतिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुडचे प्रशांत वासनिक, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, अभियंता पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अविनाश भगत, माजी जी. प. उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (कामारकर), लोकहीत शिक्षण संस्थाचे अध्यक्ष महेश खडसे, तहसीलदार एकनाथ काळबांडे, न. प. मुख्याधिकारी किरण सुकलवाङ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, भिमराव कांबळे, विठ्ठलराव खडसे, अर्जुन लोखंडे, राजेश वाढवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
दि. ८ एप्रिलला भीम शाहीर संभाजी भगत व संच मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. ९ एप्रिलला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक योगदान’ प्रमुख वक्ते दिशा पिंकी शेख व ज्योती खंदारे, आंबेडकरी साहित्य यांचे मार्गदर्शन होणार आहे. दि. १० एप्रिल रोजी ‘भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर प्रमुख वक्ते प्रवीण देशमुख यांचे मार्गदर्शन व प्रा. माधवराव सरकुंडे प्रख्यात वक्ते व साहित्य यांचे मार्गदर्शन होणार आहे. दि. ११ एप्रिल रोजी ‘आंबेडकरी चळवळीतील युवकांची भूमिका’ या विषयावर नितीन चंदनशिवे दंगलकार व प्रा. सय्यद सलमान यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दि. १२ एप्रिलला रोजी अनिरुद्ध वनकर यांचा भीम गीत गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. दि १३ एप्रिल रोजी ‘महाडचा मुक्ती संग्राम आणि भारतीय नागरिकांचे संवैधानिक हक्क’ या विषयावर डॉ. यशवंत चावरे माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचे मार्गदर्शन करतील. शुक्रवार, १४ एप्रिल रोजी महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ७.३० वाजता पंचशील ध्वजारोहण, सामूहिक बुद्ध वंदना व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व समता सैनिक दलाची मानवंदना होईल. सकाळी ९ वाजता मोटर सायकल रॅली, दुपारी ४ वाजता अभिवादन रॅली व रात्री १० वाजता समारोपप्रसंगी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये धम्म क्रांती प्रज्ञापर्व २०२३ चे अध्यक्ष किशोर कांबळे, सचिव प्रा. अंबादास वानखेडे यांनी दिली. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष परमेश्वर खंदारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष एन. आर. वाहुळे यांनी मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.