आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजरी‎:ढाणकीत दत्त जयंती उत्साहात साजरी‎

ढाणकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान‎ असलेल्या श्री दत्त संस्थान खांड टेंभेश्वर नगर येथील‎ दत्त जयंती कार्यक्रमाला १३ डिसेंबरपासून सुरूवात‎ झाली. पहिल्या दिवशी दत्त प्रभूंच्या पालखीची‎ मिरवणुक काढण्यात आली. त्यात शेकडो भाविकांनी‎ दर्शनासाठी गर्दी केली होती.पंचक्रोशीतील महानुभाव‎ पंथीच्या महत्वाच्या असलेल्या १२ दत्त खांडी पैकी‎ ढाणकी येथील दत्त खांडी येथे दरवर्षी दत्त प्रभु जयंती‎ महोत्सव साजरा होतो.

१३ डिसेंबर रोजी सायंकाळी‎ पालखी (छबीना) ची मिरवणूक काढण्यात आली.‎ यासाठी सर्व विश्वस्तांनी सर्वतोपरी तयारी केली.‎ पालखीच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी कोसो‎ दूरवरून भक्त मंडळींचे जथ्थे सकाळ पासूनच‎ मंदिराच्या परिसरात डेरेदाखल होत होते. ढाणकी‎ येथील चर्मकार बांधवांकडून दरवर्षी त्यांच्या पूर्वजांनी‎ उभारलेल्या २०० वर्षांपूर्वीच्या दिपस्तंभाला २० किलो‎ सरकीला १०० लिटर गोड तेलात मुरू घालून मैदानात‎ उंच उभारलेल्या दीप स्तंभातील हंड्यात होम करून‎ यात्रेकरूला रात्रीच्या वेळी उजाला व थंडीपासून ऊब‎ देण्यासाठी होम पेटवण्यात येतो. ही परंपरा हे समाज‎ बांधव मनोभावे पाळून बाहेरगावच्या भक्त मंडळींना‎ सेवा देतात.‎

बातम्या आणखी आहेत...