आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचा कारभार चारच कर्मचाऱ्यांच्या भरोशावर‎:अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर‎ ढाणकी शाखेचा डोलारा‎

ढाणकी‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्व‎ सामान्यांचे हित जोपासणारी बँक‎ म्हणून ढाणकी जिल्हा मध्यवर्ती‎ बॅंक शाखेकडे पाहिले जाते. मात्र‎ मागील काही दिवसांपासून अपुऱ्या‎ कर्मचाऱ्यामुळे ग्राहकाची होत‎ असलेली ससे होलपट पाहता‎ बँकेचा कारभार चारच‎ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालत‎ असल्यामुळे कर्मचाऱ्यांबद्दल व‎ व्यवस्थापनाबद्दल ग्राहकांमध्ये मोठा‎ असंतोष पसरला आहे.‎

सद्यास्थितीत पि. एम. किसानचा‎ १३ वा हप्ता केंद्र शासनाकडून डि‎ बी.टी.व्दारे शेतकऱ्यांच्या थेट‎ खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांची‎ बँकेत झुंबड उडाली आहे. तसेच‎ मार्च अखेर असल्यामुळे‎ शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीची‎ प्रक्रीया, सहकारी सोसायटीमार्फत‎ शेतकऱ्यांना नविन हंगामासाठी‎ पिककर्ज वाटप यासाठी करावी‎ लागणारी पूर्वतयारी यासारख्या एक‎ ना अनेक कामाचा बोजा‎ मोजक्याच कर्मचाऱ्यांवर‎ असल्यामुळे कर्मचाऱ्यांची होत‎ असलेली धावपळ ही नित्याचीच‎ असते.

या शिवाय इंदिरा गांधी‎ निराधार योजना, दिव्यांगांचे‎ अनुदान, श्रावणबाळ योजनेचे‎ इत्यादी शासकीय योजनेचे लाभार्थी‎ याच बॅंकेशी जोडले आहे. त्यामुळे‎ एवढा मोठा कामाचा व्याप पाहता‎ इथे किमान ७ ते ८ कर्मचाऱ्यांची‎ आवश्यकता आहे. मात्र शाखा‎ व्यवस्थापक ए. एम. पेंदोर, लिपिक‎ एस. ए. पवार, रोखपाल एस. जी.‎ जाधव, शिपाई नागो सुरोशे यांची‎ बॅंक ग्राहकांना सेवा देता देता‎ नाकीनऊ होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...