आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:ढाणकी जि.प. शाळेत 280 मुला-मुलींना प्रत्येकी 2 गणवेशांचे वाटप

ढाणकी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी बक्षिस वितरणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. २ सप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.दरवर्षी केंद्र व राज्य सरकार कडून शालेय गणवेशासाठी समग्र निधी शासकीय शाळांना प्राप्त होतो. त्या अनुशंगाने ढाणकीतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीच्या २८० मुला-मुलींना प्रत्येकी २ या प्रमाणे ५६० गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ठाणेदार प्रताप भोस होते. तर प्रमुख उपस्थिती माजी सभापती खाँजाभाई कुरेशी, नगरसेवक संबोधी गायकवाड, नगरसेवक बाळा योगेवार, सामाजीक कार्यकर्ता वंचितचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, सामाजीक कार्यकर्ता पंकज केशेवाड, साईनाथ मंतेवाड, पत्रकार संघाचे विनोद गायकवाड, स्वप्नील चिकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका वनमाला जवळेकर व इतर पदाधिकारी मान्यवर हजर होते.

दरवर्षी या शाळेकडून जनहितार्थ व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उपक्रम राबवले जातात. यावर्षी सुध्दा देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत हस्ताक्षर, चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. हस्ताक्षर स्पर्धेत शुभांगी दशरथ तिरमकदार हिने प्रथम क्रमांक मिळविला तर व्दितीय बक्षिसाची मानकरी अंजली उत्तम पाईकराव ही चिमुकली ठरली. चित्रकला स्पर्धेत मेघा सारनाथ राऊत हिने पहिले बक्षीस पटकावले तर संचिता अमोल कांनिंदे ही चिमुकली दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. रांगोळी स्पर्धेत वर्ग पाचवीची अंकिता अमोल कानिंदे हिने पहिले बक्षीसाचा मान मिळविला. तर दुसरे बक्षीस साक्षी सारनाथ राऊत हिने आपल्या नावे केले.

ठाणेदार प्रताप भोस यांनी कौतुक केले. खाँजाभाई कुरेशी यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना संबांधीत करतांना म्हणाले की, सद्यास्थीतीत पालकांचा इंग्रजी शाळेकडे असणारा कल हा भविश्यात मराठी शाळेची डोकेदुखी ठरू शकते त्यासाठी मराठी शाळेच्या शिक्षकांना कठोर परीश्रम घेवून सुप्त गुनांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतीक व शैक्षणीक उपक्रम राबवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे गरज असल्याचे सांगीतले.यावेळी जॉन्टी विणकर यांनी उपक्रमांचे कौतूक केले. प्रास्तावीक मुख्याध्यापिका वनमाला जावळेकर, सुत्रसंचालन गजानन कुंभरवार तर आभार शरद बचाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राठोड, शेळके, प्रतापवार, केंद्रे, इरलेवार, शिणकरे, पालेकवाड इत्यादी शिक्षक वृंदानी अथक परीश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...