आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामे अखेर पाण्याच्या पातळीने तळ घातल्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे झाले. त्यामुळे ढाणकी वासीयांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ढाणकी शहराला पंधरा दिवसानंतर होणाऱ्या नळाद्वारे पाणीपुरवठा यांनी सर्वांची झोप उडाली आहे.
कोसोदूर पायपीट करून पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती. ही नागरिकांची नित्याचीच गरज झाली आहे. परिसरातील एखादा बोअरवेल कसाबसा सुरू असेल तेथे महिलांना पाण्यासाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत पाण्याचा हंडाभर पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नगरपंचायतला पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत बंद पडले असून पैनगंगा नदी वरून पंधरा दिवसा आड नळाद्वारे पाणीपुरवठा केल्या जातो. शहरातील बहुतांश नागरिकांना पिण्याचे पाणी मोठाली किंमत देऊन विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण आहे. कमाईचा निम्म्याहून अधिक पैसा पाण्यासाठी खर्च करावा लागत असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.