आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:ग्रामपंचायतच्या विहिरीत पोहताना बुडून झाला मृत्यू

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीत पोहताना थाळेगांव (पुनर्वसन) मधील एका ४८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. विनोद कुरडकर वय ४८ वर्ष, असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार थाळेगांव (पुनर्वसन) येथे शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक दुर्गा विसर्जन होते. मंडळाचे कार्यकर्ते मंडपात देवीची आरती करीत होते. अशात मृत विनोद कुरडकर यांनी मंडपाच्या बाजुला असलेल्या ग्रामपंचायतच्या विहिरीत पोहण्यासाठी उडी मारली. याची माहिती मिळताच युवकांनी त्यांना बाहेर काढले. मात्र, त्यांनी पुन्हा विहिरीवर जाऊन उडी टाकली. विहिरीला पाणी भरपूर असल्याने विनोद कुरडकर विहिरीच्या तळाशी गेले असता, वरती आलेच नाही. त्यामुळे मृतकचा भाऊ भास्कर कुरडकर वय ३८ वर्ष यांनी कळंब पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...