आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलंक:ही बातमी तुम्हाला प्रचंड अस्वस्थ करणार आहे, मात्र जे घडले ते असेच भयंकर असल्यामुळे या बातमीला हेडिंग देण्याची हिंमत आमच्यात नाही

दिग्रस7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाची चाळिशी गाठलेला बेवडा पाेरगा. सून पाेराला साेडून माहेरी गेलेली. सत्तरीच्या दिशेनं झुकलेल्या त्याच्याच मायला ताे रात्रंदिवस छळायचा. दारूच्या नशेत त्यानं सख्य्या मायजवळच कित्येकदा शरीरसुखाची मागणी केली. अशा विकृतीला कंटाळेल्या आईनं अखेर गुरुवारी लाकडी काठीनं डाेक्यावर वार करत मुलाला यमसदनी धाडलं. ही समाजमन सुन्न करणारी घटना आहे दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथील.

लहान भावाचा खून केलेला विनाेद अडीच वर्षांपूर्वीच कारागृहातून सुटला हाेता. त्यानंतरही कामधंदा करत नसल्यामुळे बायकाे साेडून गेली. गावातही प्रतिष्ठा नसलेला विनाेद त्याच्याच धुंदीत जगणं जगत हाेता. माय तरीही अशा लेकराला माेठ्या हिमतीनं वयाच्या पासष्टीतही पाेसत हाेती. पण मुलाच्या राेजच्या वागण्यानं मरणयातना भाेगणाऱ्या मातेनं दारुड्या मुलाच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करत त्याला संपवले.

विनोद हा दररोज दारूच्या नशेत आईला नाहक त्रास देत होता. आईलाच शरीरसुखाची मागणी करीत होता. हा रोजचा त्रास आईला असह्य झाल्याने तिने गुरुवारी सकाळच्या सुमारास दारुड्या विनोदवर लाकडी काठीने वार करत त्याची हत्या केली. या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...