आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दिग्रस पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धडक कारवाई

दिग्रस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावठी दारू अड्ड‌यावर पोलिसांची धाड टाकून २५ ते ३० हजार रुपयांच्या मुद्देमालासह मोहाचा सडवा व इतर साहित्य नष्ट केले. ही कारवाई १९ ऑगस्टला दिग्रस पोलिसांनी पार पाडली असून या धडक कारवाईमुळे अवैध गावठी दारूची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील दिलीप रत्ने हा घराच्या पाठीमागे टीन शेडमध्ये गावठी हातभट्टी चालवत होता. याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्या ठिकाणी सापळा रचून मोठ्या प्रमाणात असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली. यामध्ये मोहाचा व इतर साहित्य नष्ट करण्यात आला असून काही साठा जप्त करण्यात आला आहे. दारूसाठा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व एकूण आठ ड्रम जप्त करून पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.

या कारवाई मोठी असल्याने इतर अवैध दारूची विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ही कारवाई ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर, सचिन राऊत, दिलीप राठोड, रमेश जाधव व होमगार्ड यांच्या साहाय्याने करण्यात आली आहे.,

बातम्या आणखी आहेत...