आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महसूल विभागातील महसूल सहायकांची रिक्त पदे भरण्यात यावी, या सोबतच इतर प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने दि. ४ एप्रिलपासून पुकारलेल्या बेमुदत संपात दिग्रस तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
शासन निर्णय दि. १ मे २०२१ अन्वये राज्य स्तरीय केलेला नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा, अव्वल कारकून मधून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, महसूल सहायकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत,तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, नायब तहसीलदार ग्रेड पे ४३०० रुपयांवरून ४६०० रुपये करावा, दांगट समितीचे अहवालानुसार आकृतीबंध लागू करावा व टांगट समितीचा अहवाल प्रसिध्द करून अंमलबजावणी करावी, संजय गांधी निवडणूक, रो.ह.यो., पीएम किसान सह इतर महसूलेत्तर कामांसाठी स्वतंत्र पदे निर्माण करावीत, बऱ्याच कालावधीपासून अस्थायी असणारी पदे कायम करावीत, सुधारित निकषांनुसार पदोन्नतीची प्रक्रिया विहित काल मर्यादित पूर्ण करावी, नियमानुसार पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वर्ग-३ महसूल सहाय्यक पदी पदोन्नती द्यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा पदोन्नती कोटा २५ टक्के वरून ५० टक्के करावा, कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी मध्ये पदोन्नती कोठा ४० टक्के केला.
त्याप्रमाणे भरती प्रक्रिया करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या बेमुदत संपात दिग्रस तहसील कार्यालयाचे कर्मचारी आर. एस. शेख, आर.बी.तुपोने,पी.टी.हनवते,जी.जी.शिखरे,ए. जी.शिरडकर, एस.एस.हिरास.आर.डी. जंगले, ए. यु.चव्हाण, प्रशांत मुक्कावार, एम.एस.खान,ओम गावंडे,जे.बी.बावणे,टी. एम.पवार,उमेश भालेराव, गजानन मोरे,सचिन देशमुख आदी सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.