आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना‎ डिप्लोमा-एसवायचे थेट दार बंद‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीनंतर दोन वर्षांचा‎ एमसीव्हीसी म्हणजेच मिनिमम‎ कॉम्पेन्टेन्सी ॲण्ड व्होकेशनल‎ कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना‎ डिप्लोमा अभ्यासक्रमात थेट‎ द्वितीय वर्षात प्रवेश देण्याची‎ सवलत आहे. ती आता यंदा‎ पुरतीच मर्यादित असणार आहे.‎ तंत्रशिक्षण संचालनालयाने ३१‎ मार्च २०२३ रोजी दिलेल्या‎ आदेशानुसार शैक्षणिक वर्ष २०२४‎ -२५ पासून ही सवलत बंद होणार‎ आहे. याचा अर्थ जून २४ मध्ये‎ एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या‎ विद्यार्थ्यांनाही दहावी गुणांच्या‎ आधारे डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेत‎ सहभागी होता येईल. थेट द्वितीय‎ वर्षात प्रवेश घेता येणार नाही.‎ राज्यातील बारावी व्होकेशनल‎ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी‎ या वर्षी पदविका अभ्यासक्रमातील‎ द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेण्याची‎ ही अंतिम संधी राहील.

दहावी‎ उत्तीर्ण झाल्यानंतर एमसीव्हीसी ही‎ करिअरला पूरक अशी विद्या‎ शाखा आहे. कला, वाणिज्य व‎ शास्त्र शाखेसारखी ही विद्याशाखा‎ आहे. तंत्रशिक्षण प्रवेशासाठी‎ आता या विद्यार्थ्यांना पदविका‎ द्वितीय वर्षात थेट प्रवेशाची‎ सवलत बंद होत आहे. अकरावी‎ व बारावीच्या धर्तीवर व्यावसायिक‎ अभ्यासक्रमांची म्हणजेच‎ व्होकेशनल अभ्यासक्रमांची‎ सुरुवात ९० च्या दशकात झाली‎ होती. तंत्रकुशल विद्यार्थी तयार‎ व्हावेत, देशातील बेरोजगारी दूर‎ व्हावी, या उद्देशाने डॉ. कोठारी‎ आयोगाच्या शिफारशींनुसार या‎ विद्याशाखेस प्रारंभ झाला होता.‎ मात्र आता डिप्लोमा, एसवायच्या‎ विद्यार्थ्यांना थेट प्रवेश बंद केला.‎