आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:दिग्दर्शक मंजुळेंचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार; पालकमंत्र्यांनी दिली सूतमाला व चरखा भेट

वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, सूतमाला व चरखा भेट देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, सेलू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक आदी उपस्थित होते. तत्पूर्वी नागराज मंजुळे यांनी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर सामाजिक संस्कार अधिक चांगल्या पध्दतीने रुजवणे सोपे असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...